Ladki Bahin Yojana : निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता लाडक्या बहिणींना इशारा? ‘त्या’ महिलांकडून दंडासह वसुली होणार
निवडणूक झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी नियमबाह्य असणाऱ्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज मागे घेण्याचा इशारा दिलाय. इतकंच नाहीतर अन्यथा दंडासह वसूलीसाठी तयार राहा.. असं देखील सत्ताधारी नेते म्हणताय.
निवडणुकीपूर्वी ज्या नेत्यांना लाडक्या बहिणींच्या मायेचा उमाळा येत होता. तेच नेते आता याच लाडक्या बहिणींना वसुलीचा इशारा देतायत. नियमामध्ये नसलेल्या लाडक्या बहिणींनी आपले अर्ज स्वतःहून मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल,असा इशाराच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दिला. तर निवडणुकी आधी अवैध्य अर्ज मंजूर कसे झालेत? असा सवाल विरोधकांकडून केला जात होता. मात्र यावर प्रत्येक अर्ज तपासूनच मंजूर झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होता. परंतू आता निवडणूक झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी नियमबाह्य असणाऱ्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज मागे घेण्याचा इशारा दिलाय. इतकंच नाहीतर अन्यथा दंडासह वसूलीसाठी तयार राहा.. असं देखील सत्ताधारी नेते म्हणताय. त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज निवडणुकीपूर्वी मंजूर केले असतील तर त्यावर काय? आणि कोणावर कारवाई होणार? याबद्दल छगन भुजबळ काही म्हणाले नाहीत. बघा स्पेशल रिपोर्ट…