भाजपचे ‘हे’ 4 मंत्री बिनकामाचे, दादांच्या आमदारानं सरकारला दिला घरचा आहेर; म्हणाले, गेल्या 6 महिन्यांपासून….

| Updated on: Jul 24, 2024 | 11:20 AM

'गेल्या ६ महिन्यांपासून अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील हे फिरकले देखील नाहीत. त्यांनी फोन सुद्धा घेतला नाही. मला आमदार म्हणून खंत वाटते, असं म्हणत मिटकरी म्हणाले, शेती, पूरस्थिती, कापूस आणि सोयाबिनच्या समस्या विखेंना सांगायच्या होत्या, पण त्यांनी गेल्या ६ महिन्यांपासून पाठ फिरवली'

महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत गेलो असे म्हणणाऱ्या अजित पवार गटातून आता भाजपच्या मंत्र्यांच्या कारभारावरून गंभीर आरोप होतोय. महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासह भाजपचे चार मंत्री काही कामाचे नाही, असे म्हणत अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील हे फिरकले देखील नाहीत. त्यांनी फोन सुद्धा घेतला नसल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि कामगार मंत्री सुरेश खाडे हे भाजपचे चार नेते बिनकामाचे असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. राधाकृष्ण विखेपाटील यांच्या नाराजीवरून अमोल मिटकरी यांनी हा दावा केला आहे. मला आमदार म्हणून खंत वाटते, असं म्हणत मिटकरी म्हणाले, शेती, पूरस्थिती, कापूस आणि सोयाबिनच्या समस्या विखेंना सांगायच्या होत्या, पण ते गेल्या ६ महिन्यांपासून विखे अकोल्यात फिरकलेच नाहीत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 24, 2024 11:20 AM
Central Railway Update : सायन-माटुंगा दरम्यान नेमकं काय झालेलं? ज्यामुळं ‘मरे’ची वाहतूक होती विस्कळीत? प्रवाशी संतप्त
कलगीतुरा तमाशाच्या फडापर्यंत? दरेकर हे नथ नसलेली तमाशातली… अन् जरांगे म्हणजे गणपत पाटील?; नेत्यांमध्ये जुंपली