गल्लीतील नेत्यांनी दिल्लीतील घडामोडींवर…, रोहित पवारांना कुणी डिवचलं?
रोहित पवार यांनी दुसऱ्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे विचारताना आपण आपल्या पक्षासाठी काय केलं हे बघावं मग दुसऱ्यांवर टीका करावी, अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी केलं असून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे.
गल्लीतील नेत्यांनी दिल्लीतील घडामोडींवर आपल्या प्रसिद्धीसाठी बोलू नये, असं वक्तव्य अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी केलं असून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. इतकंच नाहीतर रोहित पवार यांनी मतदारसंघासाठी काय केलं ते पाहावं, असा खोचक सवालही सूरज चव्हाण यांनी रोहित पवार यांना केला आहे. ‘महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतके वाईट दिवस आलेले नाहीत की त्यांना रोहित पवार यांच्या सल्ल्याची गरड पडेल. रोहित पवार यांनी दुसऱ्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे विचारताना आपण आपल्या पक्षासाठी काय केलं हे बघावं मग दुसऱ्यांवर टीका करावी’, असा हल्लाबोल सूरज चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर केला आहे.
Published on: Jun 09, 2024 05:30 PM