‘रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 टक्के शेण…’, अमोल मिटकरींची खोचक टीका
रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 टक्के शेण भरलेले दिसेल, अशी खोचक टीका अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीं यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे. बघा काय म्हणाले अमोल मिटकरी ?
अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. तर रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 टक्के शेण भरलेले दिसेल, असे वक्तव्य करत अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढे अमोल मिटकरी असेही म्हणाले, रोहित पवार यांच्या मेंदूत 50 टक्के शेण भरलेले असल्यामुळेच ते बालीशप्रमाणे वक्तव्य करत आहेत. तर त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये, आपण स्वतःची लायकी तपासावी, जातीय अहंकार अंगात भरलेल्या बालिश व्यक्तींनी अजित पवारांवर बोलू नये आणि अजित पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर फुंकण्यासारखे आहे, असेही आमदार मिटकरी म्हटले आहेत. तर रोहित पवार यांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा हा त्याच्या पक्ष वाढीवण्यासाठी चालवावा, असा सल्लाही अमोल मिटकरींनी दिला आहे.