प्रकाश सोळंके जरांगे यांच्या भेटीला, माझ्याकडून चूक झाली; ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर स्पष्टच बोलले
अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल. मराठा आंदोलनादरम्यान निर्माण झालेले गैरसमजं दूर करण्यासाठी घेतली मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्यात काय झाली चर्चा?
जालना, ४ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात हिंसक वातावरण निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यात अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर देखील मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. यांच्या बंगल्यावर आधी दगडफेक आणि नंतर जाळपोळ करण्यात आली होती. हेच आमदार आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. आंदोलनादरम्यान निर्माण झालेले गैरसमजं दूर करण्यासाठी जरांगेंची भेट घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश सोळंके यांच्यात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सोळंके म्हणाले, ‘प्रत्यक्ष भेट घेऊन मनोज जरांगे यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो मी दूर करणार आहे, असं मी म्हटलं होतं. मी पहिल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून पुढाकार घेत आहे. मी मराठा असल्याना माझा याला विरोध असण्याचं कारण नाही.’