हार्वेस्टर घोटाळ्याकडे दादांचा कानाडोळा? ‘मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले’
एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडचे अनेक गुन्हे समोर येतायत. दहशतीमुळे वाल्मिक कराडच्या अनेक तक्रारी आहेत. पण या तक्रारी देण्यासाठी लोकं समोर येत नव्हते. मात्र आता सोलापूरमधील अनेक लोकं पंढरपूर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची तक्रार दाखल केलीये.
हार्वेस्टर घोटाळ्याची कल्पना अजित पवार यांना देऊनही काही उपयोग झाला नाही, असा गंभीर आरोप फसवणूक झालेल्या यंत्र मालकाने केला आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराने शेतकऱ्यांकडून करोडो रूपये घेतल्याचा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराडवरील एक गुन्हा समोर आल्यानंतर अनेक गुन्हे समोर येऊ लागलेत. अशातच विविध ठिकाणी फसवणूक झालेले शेतकरी समोर येऊ लागलेत. दरम्यान, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर होत असलेल्या हार्वेस्टर घोटाळ्याच्या आरोपांमुळे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सारा घटनाक्रम सांगून कराडसह अनेकांवर आरोप केलेत. ऊस तोडणीच्या हार्वेस्टर मशीनचं अनुदान मिळवून देतो म्हणून कराडसह त्याच्या साथीदारांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना खोटं आमिष दाखवलं आणि १४० शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ८ लाख रूपये घेऊन नंतर मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट