Special Report | काका-पुतण्याचं नातं, आहे तरी कसं?

Special Report | काका-पुतण्याचं नातं, आहे तरी कसं?

| Updated on: Dec 12, 2021 | 9:54 PM

पवारांबद्दल भरभरून बोलताना एका क्षणी अजितदादा अत्यंत भावूक झाले. त्यावेळी त्यांनी मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाही, अशी भावना व्यक्त करून आपलं भाषण थांबवलं. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही हेलावून गेले होते. 

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यकार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते सादर केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही बोलायला उभे राहिले. पण शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भारावून गेले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. पवारांबद्दल भरभरून बोलताना एका क्षणी अजितदादा अत्यंत भावूक झाले. त्यावेळी त्यांनी मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाही, अशी भावना व्यक्त करून आपलं भाषण थांबवलं. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही हेलावून गेले होते. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीने व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलं आहे. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी संवाद साधला.

Naseem Khan | एमआयएम ही एक गाडी, भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं MIM बोलते – नसीम खान
Special Report | भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय, ऊसतोड मजुरांसोबत मुंडेंच्या गप्पा आणि जेवण