VIDEO : Ajit Pawar | 30 वर्षापूर्वी मी धाडस केलं अन्, अजित पवारांच्या राजकारणाचा मुहूर्त
लोकांना वैयक्तिक भेटलो. लोकांनी मला निवडणूक दिले अन मी बँकेत गेलो . तेव्हा बँकेच्या ठेवी होत्या 391 कोटी रुपये. आज या गोष्टीला 30 वर्ष झाली. बँकेच्या ठेवी आता 11 हजार कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत. असे म्हणत राजकारणातील 30 वर्षापुर्वीच्या प्रवेशाचा त्यांना उलगडा केला.
मला आठवतय 1991 साली त्यावेळी स्वर्गीय सुभाष अण्णा कुल व रमेश थोरात यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, तुम्हाला जिल्हा बँकेच्या राजकारणात यायच असेल तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अ वर्गातून निवडणूक लढवा. त्यावेळी बारामतीतील जागा कधी आपल्या विचारांची येत नव्हती , तिथे आपले सहकारी काकडे परिवाराचं वर्चस्व होतं, त्यामुळं तिथं निवडणूक लढवायला नाखूष असायचे. पण या दोघांचे म्हणणे मी ऐकले त्यावेळी धाडस दाखवले. लोकांना वैयक्तिक भेटलो. लोकांनी मला निवडणूक दिले अन मी बँकेत गेलो . तेव्हा बँकेच्या ठेवी होत्या 391 कोटी रुपये. आज या गोष्टीला 30 वर्ष झाली. बँकेच्या ठेवी आता 11 हजार कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत. असे म्हणत राजकारणातील 30 वर्षापुर्वीच्या प्रवेशाचा त्यांना उलगडा केला.