आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा जाळायचा होता, ‘त्या’ कृतीनंतर कुणी व्यक्त केला संताप?

| Updated on: May 29, 2024 | 4:30 PM

जितेंद्र आव्हाड यांच्या त्या कृतीनंतर ठाण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा फाडत निषेध नोंदवला. जितेंद्र आव्हाड हे नाटक करत आहेत. प्रसिद्धी घेण्यासाठी नौटंकी करत आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी केली. बघा नेमका काय केला हल्लाबोल?

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाड या ठिकाणी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर अजित पवार गट, राष्ट्रवादी चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या त्या कृतीनंतर ठाण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा फाडत निषेध नोंदवला. जितेंद्र आव्हाड हे नाटक करत आहेत. प्रसिद्धी घेण्यासाठी नौटंकी करत आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे. तर याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र होणाऱ्या टीकेनंतर आणि घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण देताना महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. ज्या मनुस्मृतीमधे महिलांच्या संदर्भात अत्यंत खालच्या भाषेत लिहण्यात आलं आहे, त्याचा विरोध करत असताना अनावधानाने माझ्याकडून आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आले. त्यासंदर्भात मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, असे आव्हाड म्हणाले.

Published on: May 29, 2024 04:30 PM
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा…
Baramati Lok Sabha Constituency : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?