Baba Siddique Firing : झिशान सिद्दीकी हल्ल्यातून थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्…

| Updated on: Oct 13, 2024 | 10:23 AM

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

Follow us on

गोळीबाराच्या हल्ल्यातून झिशान सिद्दिकी हे थोडक्यात बचावले. झिशान आणि बाबा सिद्दिकी हे एकत्र सोबत घरी जाणार होते. गोळीबाराच्या घटनेच्या आधी एक फोन आल्याने ते ऑफिसमध्ये थांबले होते. त्यामुळे झिशान सिद्दीकी हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. या फोन नंतर झिशान सिद्दिकी हे ऑफिसमध्येच थांबले आणि बाबा सिद्दिकी हे एकच ऑफिस बाहेर पडले यावेळीच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दिकी हे ऑफिसमध्ये असताना बाबा सिद्दिकी हे ऑफिसबाहेर पडून आपल्या गाडीत बसले होते. यानंतर गोळीबार झाल्याचा आवाज आला यावेळी बाबा सिद्दिकी यांच्यावरच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांना दोन गोळ्या छातीत लागल्या होत्या तर दुसरी गोळी पोटाच्या भागात लागली होती. अशा तीन गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर त्यांच्या गोळी लागलेल्या भागातून मोठा रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.