झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या पक्षाकडून लढणार?

| Updated on: Oct 22, 2024 | 5:07 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात विधानसभेचे मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर कऱण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून उमेदवारी यादी बनवण्याचे काम जोरात सुरू आहे.

झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधासभा निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. मात्र झिशान सिद्दीकी हे कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र झिशान सिद्दीकी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज देखील मागविल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना झिशान सिद्दीकी हे कोणत्या राजकीय पक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असताना आता झिशान सिद्दीकींची ही चर्चा होताना दिसतेय. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ हा एक भाग आहे. सध्या काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे येथील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदार अधिक असून मराठी मध्यमवर्ग तसेच हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांचं लक्षणीय प्रमाण असल्याचे चित्र आहे.

Published on: Oct 22, 2024 05:07 PM
‘राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर…’, 5 कोटींच्या घबाडाचा आरोप होताच शहाजी बापूंचं थेट प्रत्युत्तर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, ‘या’ 3 जणांची उमेदवारी फिक्स