दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार सोबत येण्यासाठी… अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार सोबत येण्यासाठी ५० टक्के तयार होते. तर १५ आणि १६ जुलै रोजी आम्ही शरद पवार यांना विनंती केली होती. इतकंच नाहीतर पुण्यात उद्योगपतीच्या घरी अजित दादा- शरद पवार भेटीही झाली होती, असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दावा केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार सोबत येण्यासाठी ५० टक्के तयार होते. तर १५ आणि १६ जुलै रोजी आम्ही शरद पवार यांना विनंती केली होती. इतकंच नाहीतर पुण्यात उद्योगपतीच्या घरी अजित दादा- शरद पवार भेटीही झाली होती, असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल जे म्हणाले ते सत्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार सोबत येण्यासाठी होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात मी काही बोलणार नाही. यापूर्वी मी बोललो आहे…पण हे सत्य आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on: Apr 11, 2024 04:53 PM