‘एवढीच मळमळ होतेय तर म्हशीचे इंजेक्शन अन्…’, दादा गटाच्या महिला नेत्याचा ‘त्या’ वक्तव्यावरून तानाजी सावंतांना खोचक टोला
तानाजी सावंत हे राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत, असं वक्तव्य करून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी तानाजी सावंत यांची लायकीच काढली आहे. बघा नेमकं काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे पाटील?
एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते, असे खोचक वक्तव्य करत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हेच ते तानाजी सावंत आहे, जे धरण खेकड्यांमुळे फुटलं म्हटले होते. हपकिन हा माणूस आहे, असे ते म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते. तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत. एवढीच मळमळ होत असेल तर तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते.’ असं रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या तर पुढे त्या असेही म्हणाल्या, साखर कारखान्याला भरघोस निधी घेताना कुठे गेली होती मळमळ. एवढेही बेताल बोलू नका की महाराष्ट्राच्या जनतेला तुमची लाज वाटेल. तर बोलताना विचारपूर्वक बोला याचा शेवट राष्ट्रवादी करणार असल्याचे म्हणत रूपाली ठोंबरे पाटील यांनी तानाजी सावंत यांना इशारा दिला आहे. दरम्यान, “अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात,”, असे वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं.