Jayant Patil | धाडी टाकून आमच्या नेत्यांची बदनामी, हे भाजपचं षडयंत्र : जयंत पाटील
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 5
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार लपवण्यासारखं काहीच करत नाहीत. त्यामुळे काही लपवण्याचा प्रश्नच येत नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, असं जयंत पाटील म्हणाले.