गडचिरोली पोलीस दलासाठी विशेष रुग्णालय स्थापन करण्यात येणार, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

| Updated on: Mar 11, 2022 | 3:38 PM

सैन्य दल रूग्णालयाच्या धर्तीवर गडचिरोली पोलीस दलासाठी विशेष रुग्णालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नाशिकसह (Nashik) मुंबई, (Mumbai) नागपूरमध्ये (Nagpur) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा  अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. तसेच येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. अजित पवार […]

सैन्य दल रूग्णालयाच्या धर्तीवर गडचिरोली पोलीस दलासाठी विशेष रुग्णालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नाशिकसह (Nashik) मुंबई, (Mumbai) नागपूरमध्ये (Nagpur) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा  अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. तसेच येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. अजित पवार यांनी दुपारी दोनच्या सुमारास अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली. ते म्हणाले की, देशातील होतकरू युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेश संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवणार- अजित पवार
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 100 कोटी, अजित पवार यांची मोठी घोषणा