Ajit Pawar : ‘रात्री 2 वाजता एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्… जयंतराव म्हणाले माझं नाव सांगू नका’, दादांनी सांगितला AB फॉर्मचा ‘तो’ किस्सा

| Updated on: Mar 26, 2025 | 1:15 PM

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची आज निवड झाली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. तर अजित पवारांनी देखील यावर भाष्य केले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशीही राजकीय नेते मंडळी आपल्या बोलण्यातून चौकार षटकार मारताय तर काही विरोधकांवर निशाणा साधताय. अशातच राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात एक किस्सा सांगितला. ‘२०२४ ला खासदारकीच्या आम्हाला महायुतीला १७ आणि ३१ जागा माहाविकास आघाडीला मिळाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघं एकत्र बसलो. एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं, लोकसभा झाली आता पुढच्या कामाला लागू…राज्याला चांगल्या योजना देऊया. आम्ही एकत्र कामाला लागलो. याचा परिणाम सभागहात पाहायला मिळाला’, असं अजित पवार म्हणाले. कामाचा माणूस ही टॅगलाईन घेऊन आण्णा बनसोडे यांनी कामाला सुरूवात केली. या माध्यमातून ते घरोघरी पोहोचले. २०१४ मध्ये ते २००० मतांनी पराभूत झाले. गौतम चाबूकस्वार यांनी त्यांना पराभूत केलं पण २०१९ ला आण्णा मात्र १७ हजार मतांनी निवडून आले, असं म्हणत असताना अजित पवारांनी एक सांगितला. बघा काय म्हणाले अजित पवार…

Published on: Mar 26, 2025 01:10 PM
Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, ‘वाघ्या’ कथा की इतिहास? सरकार सोक्षमोक्ष करणार?
Gopichand Padalkar : माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप