Ajit Pawar Live | शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग मास्क सर्वांनी वापरला पाहिजे : अजित पवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील.
महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होतील अशी माहिती आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. दरम्यान पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता नवी नियमावली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सांगितली. यावेेळी त्यांनी शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग मास्क सर्वांनी वापरला पाहिजे. हे आवर्जून सांगितले.