Ajit Pawar | आम्हीच मुख्यमंत्र्यांना येऊ दिलं नाही – अजित पवार
मुख्यमंत्री अधिवेशनाला का आले नाहीत? त्याबद्दल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. “मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहतील, असा मीही दावा केला होता. पण कोरोनाचे आकडे वाढल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका” असे अजित पवार म्हणाले.
मुंबई : हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. मुख्यमंत्री अधिवेशनाला का आले नाहीत? त्याबद्दल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. “मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहतील, असा मीही दावा केला होता. पण कोरोनाचे आकडे वाढल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका” असे अजित पवार म्हणाले.
“अधिवेशन सुरु होण्याआधी मुख्यमंत्री सभागृहात येऊन गेले होते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मार्गदर्शन केलं होतं. वर्षा बंगल्यावर स्वतः ते असतात. विधिमंडळात झालेल्या प्रत्येक विषयामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करायचे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आम्ही पाहिली. ते लवकरच आपल्यासोबत असतील” असे अजित पवार म्हणाले.