Video : 26 चा आकडा गाठायला कमी पडणार त्याची विकेट पडेल-अजित पवार
राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) धुरळा उडाला आहे. यातच आता आमदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून फोनाफोनी सुरू आहे. शिवसेनेने (Shivsena) आपले आमदार आधीच हॉटेलवर ठेवले आहेत. त्यात काही अपक्ष आमदारही आहेत. आज अजित पवारांना (Ajit Pawar) विधान परिषदेबाबात पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, यावेळी अजित पवार काही तिखट उत्तरं देताना दिसून आले. तसेच अपक्ष आमदारांना सर्वच […]
राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) धुरळा उडाला आहे. यातच आता आमदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून फोनाफोनी सुरू आहे. शिवसेनेने (Shivsena) आपले आमदार आधीच हॉटेलवर ठेवले आहेत. त्यात काही अपक्ष आमदारही आहेत. आज अजित पवारांना (Ajit Pawar) विधान परिषदेबाबात पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, यावेळी अजित पवार काही तिखट उत्तरं देताना दिसून आले. तसेच अपक्ष आमदारांना सर्वच राजकीय पक्षांनी फोन केल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. यावेळी अजित पवारांना महाविकास आघाडीतील नाराजीबाबत विचारले असतात, क्या नाराजी क्या नारजी बोल रहे हो बार बार, आमच्यात कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया देताना ते दिसून आले. तसेच मित्रपक्षांची मतं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असेही त्यांनी स्पष्ट केलं.