Ajit Pawar PC | महिन्याला 3 कोटी लस देण्याबाबतचा ठराव मंजूर : अजित पवार
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये काय काय घडलं ? कोणते ठराव मांडले गेले याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये काय काय घडलं ? कोणते ठराव मांडले गेले याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी बोलताना लसीकरणामध्ये महाराष्ट्र अग्रभागी आहे. राज्याची महिन्याला साडेचार कोटी लस देण्याची क्षमता आहे. त्यामुळे केंद्रांने राज्य सरकारला महिन्याला कमीत कमी तीन कोटी लसी द्याव्यात असा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही या ठरावला मंजुरी दिली, असे अजित पवार यांनी सांगितले.