Ajit Pawar यांनी केलेलं ‘ते’ वक्तव्य अंगलट येणार? शरद पवार गटानं उचललं कोणतं मोठं पाऊल?

| Updated on: Sep 30, 2023 | 1:26 PM

VIDEO | अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर केलेलं पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरील 'ते' वक्तव्य आता अजित दादांच्या अंगलट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | अजित पवार आणि शरद पवार गटाने दोन्ही पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितल्यानंतर निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निर्णय देणार याकडे लक्ष लागलेले असताना आता अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर भाष्य केले होते. चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्याबाबतची भूमिका त्यांनी मांडली होती. त्यावेळी अजित दादा यांनी केलेलं वक्तव्य आता त्यांच्या अंगलट येणार असल्याची शक्यता आहे. कारण शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार असे म्हणाले होते की, ’40 आमदार आणि काही खासदार एका बाजूला गेले म्हणून तिकडे आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं. मग एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील. ते एका बाजूने गेले. आता मनसेचं उदाहरण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. तो म्हणाला इंजिनही माझं, पक्षही माझा तर मग तुम्ही तसाच निर्णय देणार का?’

Published on: Sep 30, 2023 01:26 PM
‘मृत्यू अटळ…’, राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द मात्र सामनातून सडकून टीकास्त्र
सुप्रिया सुळे खाली वाकल्या अन् शरद पवार यांच्या…, बाप-लेकीचा व्हिडीओ tv9 च्या कॅमेऱ्यात कैद