Ajit Pawar स्पष्टच म्हणाले, ‘मनोज जरांगे यांना आम्ही समजावून सांगतोय पण ते त्यांना पटेना’

| Updated on: Sep 09, 2023 | 3:20 PM

VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्रीवर काल भेट घेतली, या बैठकीवर अजित पवार म्हणाले...

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अकरा जणांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री येथे महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीबाबत आणि मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले, काल रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. त्यामुळे मला अधिक माहिती घेता आली नाही. जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत. याप्रकरणी जीआर देखील काढला पण त्यांना तो मान्य नाही, सरकारचे यावर प्रयत्न सुरू आहेत. सरकारने कोणता निर्णय घेतला तरी शेवटी मनोज जरांगे यांना पटला पाहिजे. आम्ही त्यांना समजवण्यात कमी पडतोय. त्यामुळे सरकारने आज शिष्टमंडळ पाठवले आहे. आम्ही त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण तो त्यांना पटेना, असे अजित पवार म्हणाले.

Published on: Sep 09, 2023 03:18 PM
Sanjay Raut यांचा G-20 परिषदेवरून घणाघात; म्हणाले, ‘…तर ती जननी ही वांझ’
Hasan Mushrif म्हणाले, कोल्हापुरातील मोठे प्रश्न अजित पवार यांच्यामुळे मार्गी लागले अन्…