‘दाटीवाटी’च्या ‘त्या’ व्हिडीओवरून अजितदादांचं विरोधकांना खोचक प्रत्युत्तर; आम्ही दाटीवाटीनं बसू, पण…

| Updated on: Jan 18, 2024 | 6:49 PM

एकाच कारमध्ये एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार आणि गिरीश महाजन हे गर्दीत बसल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते. यावरू विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली. याटीकेवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले, शेवटी आम्ही रूबाब दाखवणारी माणस नाही, आम्ही दाटीवाटीनं, गर्दीनं सर्वांना सामावून घेणारी माणसं आहोत. आमचा तो व्हिडीओ...

मुंबई, १८ जानेवारी २०२४ : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून सताधारी आणि भाजपच्या इनकमिंगवर निशाणा साधला. जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी या शीर्षकाने हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. एकाच कारमध्ये एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार आणि गिरीश महाजन हे गर्दीत बसल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते. यावरू विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली. याटीकेवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले, शेवटी आम्ही रूबाब दाखवणारी माणस नाही, आम्ही दाटीवाटीनं, गर्दीनं सर्वांना सामावून घेणारी माणसं आहोत. आमचा तो व्हिडीओ काही लोकांकडून व्हायरल केला जात आहे. मला त्या लोकांची कीव करावीशी वाटते, असे म्हणत अजित पवार यांनी टीका करणाऱ्यांना फटकारलंय. पुढे अजित पवार असेही म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा गाडीत किती जण गेले? किती कोंबले? तर गाडीत बसलेल्यांना त्रास होईल ना…पण बाकीच्यांना त्रास होतोय असे म्हणत त्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो…त्याचा आम्हाला त्रास होईल की नाही? ते आम्ही बघू…पण तुम्हाला उगाच त्रास का होतोय? असा प्रतिसवालही अजित पवार यांनी विरोधकांना केला.

Published on: Jan 18, 2024 06:46 PM
आव्हाडांनंतर आता प्रभू रामाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, राम आणि सीता…
उद्धव ठाकरे यांचा राजन साळवी यांना दोनदा फोन अन् म्हणाले, ‘राजन तुझ्या…’