कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा व्यवहारावर परिणाम झाला नाही : अजित पवार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा व्यवहारावर परिणाम झाला नाही : अजित पवार

| Updated on: Jan 26, 2022 | 1:26 PM

अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्व ठप्प झालं होतं. त्यावेळी व्यवहार ठप्प झाले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्व ठप्प झालं होतं. त्यावेळी व्यवहार ठप्प झाले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शाळा वगळता काही प्रभावित झालेलं नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणं व्यवहार ठप्प झाले नाहीत ही दिलासादायक गोष्ट असल्याचं अजित पवार म्हणाले. 1 फेब्रुवारीपासून कॉलेज सुरु करण्याचा निर्णय झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

भाजप नगरसेवक आक्रमक होणार म्हणजे चांगल्या कामांना विरोध करणार का?, किशोरी पेडणेकर यांचा सवाल
Mumbai Whether Report | मुंबईत कडाक्याची थंडी, पारा 16 अंशावर