यंत्रणांच्या ससेमिऱ्यामुळं लोकशाही धोक्यात येईल, जरंडेश्वरवरील कारवाईनंतर अजित पवारांचं वक्तव्य
जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या करावाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुणे: जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या करावाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरंडेश्ववर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वरद्वारे न्यायालयासाठी अपील केले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. यंत्रणेचा ससेमिरा राजकारण्यांच्या मागे लावल्यास लोकशाही धोक्यात, येईल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.