परिक्षेतील घोटाळ्यांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारचं पोलीस खातं सक्षम, CBI कशाला हवं?- Ajit Pawar
परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीला सीबीआय कशाला हवी? सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी केली काय झालं? पाहिले ना…अशी खोचक प्रतिक्रिया उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच राज्याची पोलीस यंत्रणा योग्य तपास करत आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मुंबई : उद्यापासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसू लागले आहेत, कारण अधिवेशनाच्या आधी चहापानाला सर्वपक्षीय सदस्य उपस्थिती लावत असतात, मात्र भाजपने या चहापानावर बहिष्कार टाकल्याचे पहायला मिळाले, त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भाजपला चिमटे काढले, तसेच टीईटी परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे द्या म्हणणाऱ्या भाजपलाही अजित पवारांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे.
सुशांतसिंह प्रकरणाचं काय झालं? पाहिलं ना…
परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे. परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीला सीबीआय कशाला हवी? सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी केली काय झालं? पाहिले ना…अशी खोचक प्रतिक्रिया उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच राज्याची पोलीस यंत्रणा योग्य तपास करत आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.