मुख्यमंत्री शाळांसदर्भात निर्णय घेतील, पुणे आणि पिंपरीत शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य: अजित पवार

| Updated on: Aug 28, 2021 | 1:59 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेऊन टास्क फोर्सच्या सल्लयानंतर मुख्यमंत्री शाळा उघडण्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

बऱ्याच जणांचं म्हणनं आहे शाळा सुरु करा, काही जणांचं म्हणनं शाळा सुरु करु नका असं आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं कोरोना लसीकरण प्राधान्यानं करावं, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. जसं दिव्यांग व्यक्ती, देहविक्रय करणाऱ्या महिलांना दोन्ही लसीकरणात प्राधान्य दिलं. त्याप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शिक्षकांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.