Ajit Pawar | सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, एसटी संपकऱ्यांनी संप ताणू नये :अजित पवार
सरकार एक पाऊल पुढे आलंय आता टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
सरकार एक पाऊल पुढे आलंय आता टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. आमचे परिवहन मंत्री अनिल परब सातत्याने प्रयत्न करत आहेत, त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, राज्यात ओबीसी समुदाय हा मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला डावलून चालणार नाही. केंद्राने इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून अडचण आलीये, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्हाला सन्मान, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू राहतील, असं अजित पवार म्हणाले.