एकच वादा अजितदादा….समर्थकांच्या घोषणाबाजीवर अजित पवार यांचा खोचक टोला; म्हणाले, तो वादा फक्त….
बारामती येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अजित पवार भाषणातून उपस्थितांशी संवाद साधत असताना समर्थकांनी मध्ये मध्ये घोषणाबाजी केली. यानंतर अजित पवार यांनी त्यांना खोचक टोला लगावला.
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : बारामतीमध्ये आज अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार समर्थकांचा अजित पवारांना असलेला मोठा पाठिंबा पाहायला मिळाला होतो. त्याचप्रमाणे, बारामती येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अजित पवार भाषणातून उपस्थितांशी संवाद साधत असताना समर्थकांनी मध्ये मध्ये घोषणाबाजी केली. यानंतर अजित पवार यांनी त्यांना खोचक टोला लगावला. अजित पवार त्यांना म्हणाले, ‘थांबा..थांबा…निवडणुकीच्या इलेक्ट्रिक मशीनमध्ये दिसूदे तुमचा वादा…’ असे त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी बारामतीकरांना आवाहन देत इशाराही दिला. बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांच्या गटातील उमेदवाराला जिंकवण्याचं आवाहन केलं. अजित पवार म्हणाले, तुम्ही साथ देणार नसाल तर मला माझा प्रपंच पडला आहे. बारामतीत आमचा खासदार जिंकला तरच विधानसभेला उभा राहीन, असा इशारा अजितदादांनी बारामतीकरांना दिलाय.