‘माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम…’, अजितदादांचे आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप

| Updated on: Oct 29, 2024 | 5:43 PM

अजित पवार यांची आज सांगलीतील तासगाव येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मोठे आणि गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले अजित पवार?

‘आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी, म्हणून या फाईलवर सही केली’, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर केला. दरम्यान, आर. आर. आबांना अनेकदा कठीण प्रसंगात मदत केली. पण त्यांनी आपल्या विरोधातील चौकशीच्या फाईलवर सही केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले तर या गोष्टीचेच आपल्याला खूप वाईट वाटल्याचं अजित पवारांनी आज भरसभेत सांगितले. अजित पवार म्हणाले, “माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले, याच्यावर 70 हजार कोटींचा आरोप करुयात. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर ज्यादिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटींचा झाला आणि मला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाला. त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. त्याने त्या फाईलीवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत”, असे म्हणत अजित पवारांनी धक्कादायक आरोप केला.

Published on: Oct 29, 2024 05:43 PM