Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ कुणाची? दादांची की शिंदेंची? NCP च्या जनसन्मान यात्रेआधीच ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब?

| Updated on: Aug 08, 2024 | 9:04 AM

अजित पवार यांच्या प्रत्येक पोस्टवर माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक पोस्टवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख असल्याचे दिसतेय. मात्र योजनाही मुख्यमंत्र्यांच्या नावाने असे मत प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेच्या करण्यात आलेल्या जाहिरातबाजीत लाडकी बहीण झळकतेय. मात्र या योजनेचं नाव लिहितांना मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी टीका करत काहींना मुख्यमंत्री हा शब्द आवडत नसल्याचे म्हटलंय. लाडकी बहीण ही योजना नेमकी कुणाची यावरून दावे प्रतिदावे सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांचे नेते योजनेच्या नावाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण करताय तर अजित पवार गटाचे नेते माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख करताय. आजपासून सुरू होत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रा याबाबतच्या एका व्हिडीओमध्ये देखील मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Aug 08, 2024 09:04 AM
…तर युतीत राहायचं की नाही ठरवावं लागेल; शिवसेनेच्या युवा नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
Paris Olympics मध्ये कुस्तीपटू विनेश फोगटचं मेडलचं स्वप्न भंगलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय घडलं?