सत्तारांच्या फालतू टीकेला मी…; अजित पवारांचा हल्लाबोल काय?
तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेलं सरस्वतीबाबतचं विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.
अश्विनी सातव डोके, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) सरकारमध्ये अजित पवार (ajit pawar) हे मुंडकी खाणारे डायानासोर होते, असा घणाघाती हल्ला राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केला होता. त्यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही. माझी मीडियाला हातजोडून विनंती आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. महागाईचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा होऊ नये म्हणून कोणी तरी काही तरी बोलत असतं. त्यावर फोकस करू नका. ते बंद केलं पाहिजे. वेदांतासारखा प्रकल्प गेला. दोन लाख लोक तरुण तरुणींना नोकरीला मुकावं लागलं आहे. इतर प्रश्नांची सोडवणूक करा, असं माझं सत्ताधारी पक्षाला आवाहन आहे, असं अजित पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेलं सरस्वतीबाबतचं विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, असा खुलासा अजितदादांनी केला.