Special Report | उधारीचा धंदा नको, मी आलो तरी पैसे मागा, अजितदादांची फटकेबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामतीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रामाला गेले होते. त्यावेळी अधिकारी चांगलेच फैलावर आले. तर व्यावसायिकांना लाखमोलाचा सल्ला मिळाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामतीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रामाला गेले होते. त्यावेळी अधिकारी चांगलेच फैलावर आले. तर व्यावसायिकांना लाखमोलाचा सल्ला मिळाला. प्रत्येक शनिवारी अजित पवार बारामती दौऱ्यावर असतात. आजही अजितदादांनी बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी अधिकाऱ्यांना कुठल्याशा कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितलं. यावेळी अजितदादांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Published on: Sep 18, 2021 10:03 PM