कोरोनासाठी आमदारनिधीतील आणखी 1 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणार, अजित पवारांची माहिती
कोरोना पॉझिटिव्हीटी जास्त आहे त्या जिल्ह्यात दौरे सुरु आहेत. उपाययोजना ,स्टाफ अंबुलन्स औषध साठा याबाबत तयारी आढावा घेण्यात आला, अशी माहिती अजित पवार यांनी उस्मानाबाद येथे दिली.
कोरोना पॉझिटिव्हीटी जास्त आहे त्या जिल्ह्यात दौरे सुरु आहेत. उपाययोजना ,स्टाफ अंबुलन्स औषध साठा याबाबत तयारी आढावा घेण्यात आला, अशी माहिती अजित पवार यांनी उस्मानाबाद येथे दिली. ऑक्सिजन बेड उपलब्धता याचं प्रमण पाहिलं. लहान मुलांसाठी वेगळे अत्याधुनिक व्हेंटिलेटर लागतात ते उपलब्ध करणे. ब्लॅक फंग्स डोके वर काढत आहे , त्याची औषधें उपलब्ध आढावा बैठकीत घेतोय. निधी बाबत आमदारांनी 4 पैकी 1 कोटी खर्च केले आता अधिक 1 कोटी खर्च करण्याची परवानगी मागितली आहे. मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन कोरोना साठी अतिरिक्त आमदार निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. कोरोना काळात केंद्रात वीज पाणी इतर सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक दवाखान्यात ऑडिटर दिवसभर ठेवला जाणार आहे. प्रत्येक शहर तालुका निहाय दर ठरविले आहेत तसे आदेश दिले आहेत. उस्मानाबाद येथे मेडिकल कॉलेज लवकरच सुरू करणार आहेय करार करून जमीन हस्तांतरण करण्यात येईल, असंही ते म्हणाले.