म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; पुण्यातील पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांचं विधान
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यासह राज्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. काल रात्रीपासून तर पुण्यात पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. त्यामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पूरपरिस्थितीची पाहणी केली.
खडकवासल्यातील धरण लगेच भरतं. जास्त पाणी आल्याने दरवाजे उघडले. 45 हजाराचा फ्लो सोडला. पहाटे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री सोडलं असतं तर सखल भागात पाणी शिरलं असतं. लोकांना त्रास झाला असता. आता पाणी बंडगार्डनला पोहोचलं आहे. दौंडला पोहोचायला अजून तास भर आहे. त्यानंतर उजनीला जाईल. आम्ही पुणे आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.
Published on: Jul 25, 2024 11:02 AM