Ajit Pawar Uncut: देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो – अजित पवार
महाराष्ट्रात दरी निर्माण करून काहीही साध्य होणार नाही. जातीय सलोखा कधी डोक्यात येत नाही. हे सारखं सांगूनही, नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणणे, हा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. ह्या घटना घडल्या, जखमा झाल्या, तर त्या खोलवर जातात. त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतात ह्याची गरज नाही, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.
महाराष्ट्र जातीय सलोखा राखणारा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन समजात तेढ निर्माण करायचं कारण नसतं. महाराष्ट्रात दरी निर्माण करून काहीही साध्य होणार नाही. जातीय सलोखा कधी डोक्यात येत नाही. हे सारखं सांगूनही, नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणणे, हा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. ह्या घटना घडल्या, जखमा झाल्या, तर त्या खोलवर जातात. त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतात ह्याची गरज नाही, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते मुंबईत बोलत होते. तर पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) दर कपातीचा निर्णय आज होणार नाही, हे सुद्धा त्यांनी सांगितले.