अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊत यांचं नवं भाकीत काय?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून जाणार असा दावा सातत्याने विरोधकांकडून केला जात असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सध्या असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला
मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा कायम आहे. अशातच विरोधकांकडून शिंदे सरकार हे बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून जाणार असा दावा सातत्याने विरोधकांकडून केला जात असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सध्या असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना अपात्र अमदार प्रकरणाबाबातचा निर्णय हा ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टानं दिला आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे सरकार पडणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं. तर मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार भाजप सोबत सत्तेत गेल्याचे राऊत यांनी म्हटलंय. इतकंच नाहीतर ३१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपद खाली होत असल्याचा दावाही त्यांनी केला.