अजित पवार मुख्यमंत्री होणार? अजितदादांचं वय लहान, दीपक केसरकर यांनी नेमकं काय म्हटलं?
अजित पवार यांचं गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या आईनेदेखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली
सिंधुदुर्ग, ५ नोव्हेंबर २०२३ | राज्यात आज २ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे. दरम्यान, आज अजित पवार यांचं गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या आईनेदेखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा कुणाला असण्यामध्ये काही चुकीच नाही परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचाच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे, अशी वस्तुस्थिती दीपक केसरकर यांनी सांगितली. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. केसरकर म्हणाले, अजित दादांचे वय लहान आहे त्यांना पुढच्या काळात ही संधी मिळू शकते. अशा शेलक्या शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांवर प्रतिक्रिया दिली आहे.