विजय शिवतारे पुन्हा ठाम, बारामतीत अजित पवारांना देणार आव्हान, महायुतीतील नेत्यांचा दादांना घेराव
शिवतारे यांनी भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपडे यांचे वडील आनंतराव थोपडे यांची भेट घेतली आणि साथ देण्याची विनंती केली. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत काही बाबींवर मार्ग काढण्याची विनंती केली.
मुंबई, २१ मार्च २०२४ : बारामतीमधून अजित पवार यांना महायुतीतूनच घेराव घालण्यात आलाय. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात लढण्यावर विजय शिवतारे पुन्हा तयार झाले असून आपला प्रचारही सुरू केला. शिवतारे यांनी भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपडे यांचे वडील आनंतराव थोपडे यांची भेट घेतली आणि साथ देण्याची विनंती केली. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत काही बाबींवर मार्ग काढण्याची विनंती केली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याविरोधात लढण्यासाठी विजय शिवतारे यांनी आपली मोट बांधायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे माघार घेतील असे वाटले होते. पण आता पुन्हा बारामतीतून लढण्यासाठी शिवतारेंनी प्रचार आणि भेटीगाठी सुरू केल्यात. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 21, 2024 12:25 PM