Ajit Pawar : अजित पवार सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; सर्वाधिक वेळा DCM होणारे ‘दादा’ एकमेव

| Updated on: Dec 05, 2024 | 11:43 AM

महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहे. यावेळी अजित पवार आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहे. आज गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी अजित पवार आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणार अजित पवार हे एकमेव नेते आहेत. अर्थमंत्री, ऊर्जामंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम करण्याचा अजित पवार यांना अनुभव आहे. नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२ या दरम्यान अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ ते सप्टेंबर २०१४ उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवार यांचा दुसरा कार्यकाळ होता. तर २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ हा उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवारांचा तिसरा कार्यकाळ होता. यासह डिसेंबर २०१९ ते जून २०२२ उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवारांचा चौथा कार्यकाळ होता. जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२४ उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवार यांचा पाचवा कार्यकाळ तर आज पाच डिसेंबर रोजी अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Published on: Dec 05, 2024 11:42 AM
देवेंद्र फडणवीसांच्या नावे शपथविधीसह अनेक रेकॉर्ड, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
महायुती सरकारचा डोळ्यांचं पारणं फेडणारा शपथविधी सोहळा, संत महंतांसह ‘या’ नेत्यांना निमंत्रण