VIDEO : Ajit Pawar | जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवार यांचं आवाहन
जातीय सलोखा राखा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर बनली होती.
जातीय सलोखा राखा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता रुग्ण कमी होत असल्याने शासनाकडून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. परंतु या सूटीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. देशातून अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे आपली एक चूक देखील महागात पडू शकते. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळा आणि तिसरी लाट टाळा असे पवार यांनी म्हटले आहे.