मोठ्या व्यक्तींकडून न शोभणारी वक्तव्ये; अजित पवारांचा नाव न घेता राज्यपालांना टोला

| Updated on: Mar 06, 2022 | 1:20 PM

एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून मेट्रो प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन अजित पवार यांनी आज राज्यपालांवर टीका केली.

 

‘आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली’ – देवेंद्र फडणवीस
राजकीय नेत्यांच्या हट्टापायी पुणे मेट्रोला 12 वर्षे लागली; अजित पवारांचा आरोप