स्वाती वेमूल TV9 Marathi च्या डिजिटल विभागात सीनिअर सब एडिटर म्हणून काम करते. स्वाती प्रामुख्याने मनोरंजन विभागातील घडामोडींविषयीच्या बातम्या करते. त्याशिवाय ती ट्रेंडिंग, ट्रॅव्हल या विभागांशी निगडीत विविध बातम्या करते. स्वातीला पत्रकारितेत नऊ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यापैकी तिने तीन वर्षे वृत्तवाहिनीत काम केलंय. तर गेल्या सहा वर्षांपासून ती डिजिटल विभागात प्रामुख्याने मनोरंजन कॅटेगरीसाठी काम करतेय. एंटरटेन्मेंट विषयक बातम्या, सेलिब्रिटींच्या मुलाखती, विशेष लेख आणि चित्रपट-वेब सीरिज समीक्षण हा तिच्या कामाचा मुख्य भाग आहे.
स्वातीने 2014 मध्ये मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅच्युएट डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘TV9 Marathi’ या वृत्तवाहिनीत तिने काम केलं. स्वातीला वृत्तवाहिनीतील आऊटपुट आणि इनपुट अशा दोन्ही विभागातील कामाचा अनुभव आहे. स्वातीने डिजिटल विभागातील कामाची सुरुवात ‘लोकसत्ता’ या वेबसाइटपासून केली. ‘लोकसत्ता’मधील ‘डिजिटल अड्डा’ हा मुलाखतींचा कार्यक्रम स्वातीने सुरू केला आणि त्याला युट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘लोकसत्ता’ आणि ‘सकाळ’ या दोन्ही वेबसाइट्सच्या ‘एंटरटेन्मेंट’ विभागासाठी स्वातीने काम केलं.
‘एंटरटेन्मेंट’ विभागासाठी काम करत असतानाच स्वातीला सोशल मीडियावरील बदलता ट्रेंड आणि त्याबाबतच्या नवनव्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची, अभ्यास करण्याची विशेष आवड आहे.