सुषमाताई माझी मैत्रीण… सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ ऑफरवर अजितदादा गटाच्या महिला नेत्याची सूचक प्रतिक्रिया; काय घडतंय?
सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील उद्देशून एक ट्विट केलं असून सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार? असा सवाल केला होता. यावरच आता रूपाली ठोंबरे पाटील यांनी सूचक प्रत्युत्तर दिलं आहे. .
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील रूपाली ठोंबरे पाटील यांना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याचं निमंत्रणच दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील उद्देशून एक ट्विट केलं असून सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार? असा सवाल केला होता. यावरच आता रूपाली ठोंबरे पाटील यांनी सूचक प्रत्युत्तर दिलं आहे. . तर रूपाली पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत उपेक्षित ठेवलं जातंय, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटले तर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही सुषमा अंधारे यांनी म्हटले असून रूपाली रूपाली ठोंबरे पाटील यांना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याचं निमंत्रणच दिलं होतं. तर राजकारणात सुषमा अंधारे मझ्या मैत्रीण आहे. पण मी अजित पवार यांच्यासोबत काम करणार आहे. सुषमा अंधारेंनी ज्या काही गोष्टी वाटल्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांनी ऑफर दिल्याबद्दल मी आभारी आहे. येणाऱ्या काळात अजित पवार सोबत मी काम करणारं आहे. माझी मुस्कटदाबी होते असेल तर मी सामोर येऊन नक्की सांगेन. पुढील काळात अजित दादांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी भेटेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेची ऑफर मी सध्यातरी स्वीकारली नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.