निधी वाटपावरून Ajit Pawar यांचं फडणवीसांना उत्तर

निधी वाटपावरून Ajit Pawar यांचं फडणवीसांना उत्तर

| Updated on: Mar 16, 2022 | 6:52 PM

माझ्या खात्याकडची रक्कम वेतन आणि निवृत्तीवेतनावरही जाते. कर्जाचं व्याज भरण्यावरही जाते. हे सर्व घातलं राष्ट्रवादीच्या नावावर. असं कुठं असतं का? आशिष शेलार साहेब ठिक आहे. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. पण असलं काही तरी सांगून कुठं तरी आगीत काडी घालण्याचं काम करू नका, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) सर्वाधिक निधी घेतला असून शिवसेनेला (shivsena) सर्वात कमी निधी दिल्याची टीका केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आकडेवारीच सादर करत फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावला. ज्यावेळी अर्थसंकल्प तयार करतो. तेव्हा त्यावर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची त्यावर अंतिम सही असते. संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देते. कोणतंही सरकार चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं, पुढे न्यायचं म्हटलं तर भेदभाव करून चालणार नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही. त्यामुळे असा प्रयत्न शिवसेनाही करत नाही, राष्ट्रवादीही करत नाही आणि काँग्रेसही करत नाही. माझ्या खात्याकडची रक्कम वेतन आणि निवृत्तीवेतनावरही जाते. कर्जाचं व्याज भरण्यावरही जाते. हे सर्व घातलं राष्ट्रवादीच्या नावावर. असं कुठं असतं का? आशिष शेलार साहेब ठिक आहे. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. पण असलं काही तरी सांगून कुठं तरी आगीत काडी घालण्याचं काम करू नका, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Pravin Darekar यांची मजुर प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका High Court नं फेटाळली
Narayan Rane, Nitesh Rane यांना दिलासा मात्र Pravin Darekar यांना टेंशन