Nashik | ग्रंथदिंडीत ज्ञानोबा माऊलीचा गजर, छगन भुजबळांनी वाजवली वीणा तर झिरवळांनी धरला ठेका

| Updated on: Dec 03, 2021 | 12:57 PM

गीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

नाशिक : ग्रंथदिंडीचे वातावरण अतिशय भक्तीमय झालेले पाहायला मिळाले. पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ स्वतः विना घेऊन ग्रंथ दिंडीत चालत होते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी ग्रंथ दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. माझ्या कार्यकाळात साहित्य संमेलन होणे हे भाग्य असल्याचे उदगार अगदी कालपर्यंत नाराज असलेल्या महापौरांनी काढले. ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर यांनी ठेका धरला

ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्रानं माहिती दिली नाही
महाराष्ट्रानं ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांची माहिती दिली नाही: मनसूख मांडवीय