Akola Rain | अकोल्यात पावसाचं थैमान, सरकारी रुग्णालयात सर्वत्र पाणी
अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी आय.सीयू कक्षात शिरल्यामुळे तेथील रुग्णनं व नातेवाईक यांची एकच पळापळ झाली होती.
अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी आय.सीयू कक्षात शिरल्यामुळे तेथील रुग्णनं व नातेवाईक यांची एकच पळापळ झाली होती. यामुळे अकोला शासकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या सुस्थितीचं पितळ उघडे पडले असून तेथील मास्कोचे कर्मचारी झोपा काढतात काय असा प्रश्न तेथील रुग्णांचे नातेवाईक करत आहे. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात अकोला,बुलढाणा,वाशिम या तिन्ही जिल्हातील रुग्ण येत असतात,रुग्णांवर चांगले उपचार व्हावे यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सुसज्ज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार असुन,अंतर्गत राजकारणा मुळे अद्यापर्यंत सुरू झाले नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू करावे याची मागणी होत आहे,आज जर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले असते तर ICU मध्ये पाणी जाण्याची घटना घडली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.