Video: राजघाटावर पोहोचले G20 चे सर्व पाहुणे, महात्मा गांधी यांना वाहिली आदरांजली
G20 : महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व जी-२० चे पाहुणे आज राजघाटावर पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व पाहुण्यांना घेऊन राजघाटावर दाखल झाले,
G-20 Summit 2023 : दिल्लीत सुरू असलेल्या G-20 परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी सर्व परदेशी पाहुणे राजघाटावर पोहोचले. देशाच्या प्रमुखांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह इतर देशांचे प्रमुखही पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सर्व पाहुण्यांना राजघाटावर घेऊन आले. दिल्लीतील राजघाटावर सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांनी महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
Published on: Sep 10, 2023 11:40 AM