Maharashtra Lockdown | राज्यातले सर्व मॉल रात्री 10 वाजेपर्यत सुरु राहणार
हॉटेल 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुली राहतील. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक आहे. एसी हॉटेलमधील खिडक्या उघड्या ठेवणे बंधनकारक आहे.
मुंबई : मुंबईत आजपासून सर्व सुरु झाले आहे. मात्र यासाठी रात्री 10 पर्यंतची अट आहे, तसेच दोन डोस आवश्यक आहे. मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली होणार असून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खुली राहतील. हॉटेल 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुली राहतील. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक आहे. एसी हॉटेलमधील खिडक्या उघड्या ठेवणे बंधनकारक आहे. सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. यासाठी दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक आहे. सर्व शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार असून मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक आहे.