Bhagwat Karad | भाजप सरकारने राबवलेल्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या : भागवत कराड

| Updated on: Aug 20, 2021 | 2:12 PM

ज्या योजना भाजप सरकारने राबवल्या, सर्व योजना तळागाळापर्यंत पोचल्या आहेत. जिथे अडचणी आहेत तिथे आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या यात्रेला खूप जनाधार मिळाला, आम्ही कोरोना नियम पाळण्याचा प्रयत्न केला आहे, असे भागवत कराड म्हणाले.

भागवत कराड यांची जण आशीर्वाद यात्रा आज जालन्यात होती, या वेळी भागवत कराड यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांचे कौतुकात कमी पडु दिली नाही. मंत्री झाल्या नंतर आपणास जण आशीर्वाद यात्रा काढण्याचे संगीतल्याने आपण ही यात्रा काढल्याचे कराड यांनी सांगितले. कराड यांनी मोदींनी देशात केलेल्या कामाची यादीच वाचुन दाखवली तर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे अर्थात दाजी यांनी आपल्या खास  शैलीत  भाषण केले. जर मी आमदार खासदार मंत्री झालो नसतो, तर जवखेडा या त्यांच्या गावी मारोती मंदिरात हरिपाठ करत बसलो असतो. दानवे यांचे मंत्री पद जाणार अशी चर्चा झाल्या नंतर काही लोकांना खुशी तर काही लोकांना गुदगुल्या झाल्या, असे ही दानवे म्हणाले. दानवे एकदा निवडणुकीला उभे असताना आजारी’ पडले पण 3 लाखावर मते घेऊन निवडून आले, त्या वेळी आमदार लोणीकर आणि अर्जुन खोतकर यांनी आपण निवडून कसे आलो, असे लोनिकरांनी खोतकरांना विचारले असता, आजारी आहे म्हणून लोकांनी निवडून दिले असेल, असा किस्सा सांगितला.  तर, ज्या योजना भाजप सरकारने राबवल्या, सर्व योजना तळागाळापर्यंत पोचल्या आहेत. जिथे अडचणी आहेत तिथे आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या यात्रेला खूप जनाधार मिळाला, आम्ही कोरोना नियम पाळण्याचा प्रयत्न केला आहे, असे भागवत कराड म्हणाले.

VIDEO : Kirit Somaiya | उद्धव ठाकरे यांच्या चार महान शिवसैनिकांचे घोटाळे जनतेसमोर आणणार : किरीट सोमय्या
सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक, संजय राऊत म्हणतात…